आनंद गंधर्व:
आनंद भाटे हे नाव घेतले की डोळ्यासमोर येतो तो, एक दहा वर्षांचा, स्वत: पेटी वाजवत 'थाट समरिचा दावी नट साचा' किंवा 'वद जाऊ कुणाला शरण' म्हणणारा मुलगा. आज प्रथमच, त्याची मैफिल ऐकण्याचा योग आला.
'आनंद गंधर्व' हा, 'बाल गंधर्व' या चित्रपटासंबंधी एक कार्यक्रम. आता, बाल गंधर्व, त्यांचे संगीत, आणि याच नावाचा चित्रपट यावर खूप काही म्हटले/बोलले/लिहिले गेले आहे. तेव्हा, या विषयावरचा कार्यक्रम म्हटल्यावर, आता ही मंडळी शिळ्या कढीला ऊत आणणार की काय, अशी एक सुप्त भीती होती. पण, सुदैवाने तसे काही नव्हते.
हा कार्यक्रम म्हणजे या चित्रपटाचे स्मरणरंजन म्हटले तरी चालेल. चित्रपटाशी संबंधित गोष्टी/संदर्भ/किस्से आणि तदनुषंगाने येणारी नाट्य पदे असा हा एकूण मामला होता.
सुरुवात पारंपारिक पद्धतीने नांदी (पंचत्रुंड नररुंड) म्हणून झाली. नंतर आनंदने 'नरवर कृष्णासमान' हे पद अतिशय सुरेख सादर केले. त्यावेळी तबलजी प्रसाद पाध्येनी केलेली 'लग्गी चाट' अप्रतिम होती. पुढचा भीमपलास रागातला अभंग, 'अवघाची संसार' खूप रंगला. शेवटच्या कडव्यात 'बाप रखुमा देविवरु' या ओळीनंतरचे 'विठ्ठला मायबापा' हे एकदम 'इंद्रायणी काठी' ची आठवण करून गेले. या दोन्ही अभंगांचा राग एकच आहे. पु.ल देशपांडे आणि भीमसेनजी यांनी अजरामर केलेल्या त्या अभंगातली ओळ या अभंगात चपखल बसली (किंवा, कदाचित उलटे असू शकेल).
नाट्य संगीत हे शास्त्रीय संगीतावर कसे आधारित आहे हे दाखवताना, आनंदने प्रथम 'हरवा मोरा देहो' ही यमनमधली बंदिश म्हटली आणि मग त्यावर बेतलेले 'नाथ हा माझा' हे पद म्हटले. हे म्हणताना त्याने बंदिशीची तान कशी असते आणि नाट्य गीतात ती कशी अप्रस्तुत ठरते हेही विशद केले.
पुढे त्याने 'कशी या त्यजु पदाला' हे पद आणि त्याचा मूळ स्त्रोत हे म्हटले.
'वद जाऊ कुणाला शरण' हे सौभद्र नाटकातले अजरामर पद. या पदाच्या संदर्भात, सांगितलेले किस्से अतिशय मनोरंजक होते. 'बाल गंधर्व' चित्रपटात सुबोध भावेच्या 'Playback' साठी आनंदची निवड कशी झाली हेही ऐकण्यासारखे आहे. ही सर्व पार्श्वभूमी सांगून मग आनंदने सदर केलेले हे पद फारच रंगले आणि once more घेऊन गेले. आनंदने देखील आढेवेढे न घेता शेवटचे कडवे पुन्हा म्हटले आणि त्यात अनेक जागा नव्याने घेतल्या. एकूणच हा रंगतदार प्रकार होता .
मध्यंतरानंतर आनंदने 'नाही मी बोलत नाथा' हे पद, त्यामागच्या आठवणीसह सादर केले. आदित्यला Solo पेटी वाजवण्याची फर्माईश झाली, आणि त्यानेही ती 'सुरत पियाकी' वाजवून पूर्ण केली.
आनंदने जोगिया रागातले 'जोहार मायबाप' सुरु केले, तेव्हा वाटले की बहुधा या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होणार. आणि तसे झाले असते तरी ते संयुक्तिकच ठरले असते. रूढार्थाने भैरवी ही शेवटी येत असली तरी, भावनिक दृष्ट्या जोगिया ही भैरवीच्या पुढची stage आहे असे मी मानतो. पण आनंदने त्यानंतर 'चिन्मया सकल हृदया' या भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली.
आनंदच्या गायनाबद्दल काय बोलू? विशेषणे कमीच पडतील. शास्त्रीय संगीताचा त्याचा पाया भक्कम असल्यामुळे नाट्य संगीत म्हणताना तो अगदी सहज पणे गातो.
नाट्य गीते ही आपण इतक्या वेळा ऐकलेली असल्यामुळे ती आपल्या कानात बसलेली असतात. त्यामुळे कोणतेही नाट्य गीत ऐकताना आपण नकळत, 'तो' सूर किंवा 'ती' जागा शोधत असतो. आनंदने म्हटलेल्या प्रत्येक गीतात अचूकपणे 'ती' अपेक्षित जागा दिसतेच दिसते. त्याच प्रमाणे, एका रागातून दुसर्या रागात शिरण्याचे त्याचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. 'जोहार मायबाप' मध्ये तो जोगिया मधून विरागी (बैरागी?) भैरवात शिरतो आणि परत येतो, तसेच 'चिन्मया सकल' मध्येही तो भैरवी-ललत-भैरवी अशी हळूच एक detour करतो…
आदित्य ओक ने केलेली पेटीची साथ उत्कृष्ट होतीच, आणि त्याचे निवेदनही मार्मिक आणि समर्पक असेच होते. बाल गंधर्व या विषयाबद्दलची त्याची आत्मीयता आणि त्याने त्या विषयाचा केलेला अभ्यास जाणवत होता. विशेषत: सुबोध भावेच्या आठवणी मनोरंजक होत्या.
प्रसाद पाध्येची तबल्याची साथ सुरेख होती.
एक अतिशय सुरेख आणि सुरेल कार्यक्रम दिल्याबद्दल आनंद-आदित्य-प्रसाद यांचे आभार आणि अभिनन्दन. असेच उत्कृष्ट कार्यक्रम आपणांकडून सादर होवोत ही सदिच्छा.
- नरेंद्र जोशी